Wednesday, September 2, 2026
Homeभंडाराझाडाचा आसरा घेतला अन् कोसळली वीज; एकाचा मृत्यू..!

झाडाचा आसरा घेतला अन् कोसळली वीज; एकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसू लागला आहे.अश्याच प्रकारे आज,शनिवार १६ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसला.यामुळे शेतावर तसेच इतर कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.त्यातच  लाखांदूर तालुक्याच्या चप्राड(सोनी) पहाडीजवळील शेतशिवारात एका वृद्धाचा अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.मनोहर वाकडू कुंभले वय ६८ वर्षे, रा.चप्राड,ता.लाखांदूर असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.
मनोहर कुंभले हे आज नेहमी प्रमाणे शेळ्या चराईसाठी शेतशिवारात गेले होते.शेळ्या चराई करीत असतांनाच दुपारच्या सुमारास अचानकपणे मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला.पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी मनोहर कुंभले यांनी एका झाडाचा आसरा घेतला.झाडाचा आसरा घेताच ज्या ठिकाणी ते उभे होते,नेमकी त्याच ठिकाणी क्षणात वीज कळालली आणि थेट त्यांच्या अंगावर कोसळली.यात ते जागीच गतप्राण झाले.सदरची घटना शेतशिवारात असलेल्या नागरिकांच्या लक्षात  येताच त्यांनी तात्काळ गावात जाऊन माहिती दिली. त्यानुसार लाखांदूर पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!