Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर वार्षिक 'फास्टॅग' पास सुरू; पास खासगी वाहनांसाठी असून व्यावसायिक वाहनांसाठी नाही..!

अखेर वार्षिक ‘फास्टॅग’ पास सुरू; पास खासगी वाहनांसाठी असून व्यावसायिक वाहनांसाठी नाही..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रस्ते वाहतूक तथा महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा करीत राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘फास्टॅग’ (FASTag)वार्षिक पासला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे.काल,स्वातंत्र्य दिनी सुरू झालेल्या पाससाठी संध्याकाळपर्यंत तब्बल १ लाख ४० हजार बुकिंग्ज झाल्या असून हा वार्षिक पास खासगी वाहनांसाठी आहे.यामुळे लोकांना टोलवर मोठी बचत करता येणार आहे.हा एक प्रीपेड पास आहे,जो खासगी वाहनांसाठी (कार,जीप,व्हॅन) लागू आहे.या पासमुळे एका निश्चित रकमेच्या बदल्यात तुम्ही वर्षभर किंवा २०० टोल क्रॉसिंग (यापैकी जे आधी होईल)वापरू शकता. यामुळे वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज लागत नाही.सदर पासची किंमत ३ हजार रुपये आहे. हा पास खरेदीच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० टोल क्रॉसिंगसाठी वैध असणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मते,सरासरी ८० रुपये ते १०० रुपये टोलच्या तुलनेत या पासमुळे प्रती टोल क्रॉसिंगचा खर्च सुमारे १५ रुपये होतो.यामुळे वर्षाला ७ हजार पर्यंत बचत होऊ शकते.या पासमुळे टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही,वेळेची बचत होते आणि इंधनाचा खर्चही कमी होतो.याकरीता राजमार्गयात्रा ॲप डाउनलोड करा किंवा NHAI च्या वेबसाइटवर भेट द्या.तुमचा मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांकाचा वापर करून लॉग इन करा.तुमचा विद्यमान फास्टॅग सक्रिय आहे आणि योग्यप्रकारे वाहनावर लावलेला आहे याची खात्री करा.त्यानंतर ३ हजार रुपये भरून पेमेंट पूर्ण करा.पेमेंटनंतर काही तासांतच तुमचा वार्षिक पास तुमच्या फास्टॅग सोबत सक्रिय होऊन तुम्हाला याबाबत एक एसएमएस (SMS)देखील येईल.पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर लागू असून तो फक्त खासगी वाहनांसाठी आहे.व्यावसायिक वाहनांसाठी नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!