- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-सोशल मीडियाचा नादच खुळा.कुणी प्रसिध्दीसाठी तर कुणी चांगल्या कार्यासाठी वापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवू लागलेत.मात्र,कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कधी ना कधी जीवघेणा ठरतच असतो.अश्याच प्रकारे तिघे मित्र शाळेला सुट्टी असल्याने काल रविवारी गावापासून दूर अंतरावर मोबाईलवर रिल शूट करण्यासाठी गेले.रिल शूटिंगसाठी तिघांनी एका गावानजीक असलेल्या मुरुमाच्या खदाणीची निवड केली.त्यानुसार दोघा मित्रांनी मोबाईल हातात घेत रील शूटिंग सुरू केले तर एकाने मुरुमाच्या खदाणीतील पाण्यात उडी घेतली.उडी घेताच वाचवा-वाचवा म्हणू लागला.पण,दोन मित्रांना वाटले की,हा तर रिलचाच भाग आहे.त्यामुळे दोघांनीही दुर्लक्ष केले आणि होत्याचे नव्हते झाले.यात एका १८ वर्षीय
तरुणाचा रील काढण्याच्या नादात बुडून मृत्यू झाला. सदरची घटना काल,रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा-कोसरा गाव हद्दीत घडली. तीर्थराज धनपाल बारसागडे वय १८ वर्षे रा.सोनेगाव, ता.पवनी असे मृत तरुणाचे नाव आहे.मृतक हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता.घाबरलेल्या मित्रांनी गावात फोन करून घटनेची माहिती दिली.काही वेळातच गावकरी आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.तीर्थराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आला.घटनेने संपूर्ण परिसरात मोठा हादरा बसला आहे.
- Advertisement -

