Sunday, May 3, 2026
Homeभंडाराभंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन..

भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शेतकऱ्यांना शेतीत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतांनाच समृद्धी महामार्गाच्या
नावाखाली शेतकऱ्यांच्या संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचे दर कमी ठरवून शासन पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.कारण,मिळणारी रक्कम पुढील भविष्याची तजवीज करणारी नसून वर्तमान काळातील महागाईच्या वणव्यात होरपळणारी आहे.त्यामुळे भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना आजच्या दराच्या पाचपट मोबदला देण्याच्या मागणीसह अन्य मागण्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.या मागण्यांचे निवेदन राज्याचे महसूल तथा भूसंपादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लाखांदूर तालुका समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीतर्फे नुकतेच देण्यात आले आहे.भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्ग हा लाखांदूर तालुक्यातील काही गावांच्या सिवेतून जात असल्याने येथील शेताऱ्यांच्या शेतीची जागा या महामार्गाकरिता संपादित केली जात आहे. अशातच याच तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची शेती या महामार्गात जात आहे.अशा शेतकऱ्यांकडून अनेकदा विविध प्रकारच्या मागण्याचे पत्रव्यवहार करण्यात आले असले तरी यावर कसलाही तोडगा काढण्यात आला नाही.किंबहुना पत्रांचे कसल्याही प्रकारचे उत्तर सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही.सद्यस्थितीत येथील शेतकऱ्यांची जमीन ही उच्च प्रतीची असून उन्हाळी पावसाळी व हिवाळी अशी तिन्ही प्रकारच्या पिकांचे उत्पादन देणारी आहे.त्यामुळे,आजघडीला या शेतींचे दर २५ ते ३० लाख रुपये एकर एवढे असल्याचे येथील शेतकऱ्यांचे निवेदनातून म्हणणे आहे.त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गाकरीत संपादित केली जात आहे.त्यांना त्यांच्या शेतीच्या आजच्या दराच्या पाचपट म्हणजे एक कोटी तीस लाख रुपये दराने शेतीचा मोबदला देण्यात यावा.तसेच या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन दोन भागामध्ये विभागली जात असल्याने जाण्या-येण्याचा रस्ता व नैसर्गिक पावसाचे पाणी याची समस्या निर्माण होणार असल्याने यावर तोडगा काढण्यात यावा,अश्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!