Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरबापरे..! सर्व घोटाळे ऐकले; पण शेणखतातही घोटाळा.. - वन परिक्षेत्र अधिकारी निलंबित..

बापरे..! सर्व घोटाळे ऐकले; पण शेणखतातही घोटाळा.. – वन परिक्षेत्र अधिकारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सध्या स्थितीत हा घोटाळा,तो घोटाळा व नानाविध घोटाळे ऐकले.पण शेणखतातही घोटाळा. रोपवनात शेणखत न टाकताच ३२ लाख ६८ हजारांची खरेदी दाखविण्यात आली.प्रकरणी चौकशी झाली आणि वन परिक्षेत्र अधिकारी निलंबित  झाला. सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात घडली.सुरेश येलकेवाड असे निलंबित झालेल्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे.इतर दोन वनपाल व सहा वनरक्षकांना विभागाबाहेर बदली व महाराष्ट्र नागरी सेवा कलम १९७९ नियम आठनुसार शिस्तभंगाची कारवाई केली.चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने संबंधितांकडून रक्कमही वसूल करण्यात आली.विरूर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड केल्यानंतर वाढीसाठी शेणखत टाकले जाते.मात्र,मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर २०२४ मध्ये शेणखत खरेदी केल्याची बतावणी करुन तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी नियमाला बगल दिली.कॅम्पा योजनेंतर्गत सन २०२३-२४ मध्ये परिक्षेत्रात प्रत्यक्षात शेणखत खरेदी व गवत रोपवनात शेणखत मिसळण्याची कामेच केली नाही.अधिनस्थ वनपाल व वनरक्षक यांच्याशी संगनमत करून कामाची बनावट देयके तयार केली व ३२ लाख ६८ हजार ६०८ रुपयांचा घोटाळा केला.त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी चौकशी समिती गठित करण्याचा आदेश दिला. उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी चौकशी करून ४ एप्रिल २०२५ रोजी मुख्य वनसंरक्षकांकडे अहवाल सादर केला.चौकशीत दोषी आढळल्याने वन विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,दोन वनपाल,सहा वनरक्षकांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल केली. मात्र,मुख्य आरोपी वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नव्हती.त्यामुळे मुख्य वनसंरक्षकांनी अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.इतर दोन वनपाल,सहा वनरक्षकांना विभागाबाहेर बदली व महाराष्ट्र नागरी सेवा कलम १९७९ नियम आठनुसार शिस्तभंगाची कारवाई केली
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!