- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज,बुधवार २८ मे रोजी मुंबई येथील मंत्रालयात राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा केली.त्यांनी विशेषतः शेतकऱ्यांच्या ई-पिक नोंदणी प्रक्रिया,धान खरेदीचे सुलभ व पारदर्शक नियोजन, तसेच शेतमालाच्या साठवणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीच्या विषयावर सचिव रंजना सारंग यांच्याशी सकारात्मक संवाद साधला.या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.नव्या राईस मिल स्थापनेचा प्रस्ताव,तसेच धान साठवण्यासाठी आधुनिक व सुसज्ज गोदाम इमारतींचे बांधकाम करण्याची मागणी आमदार रामदास मसराम यांनी यावेळी स्पष्टपणे मांडली.शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी व कृषी विकासासाठी हे प्रस्ताव तातडीने मंजूर करून अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सारंग यांनी दिले.मसराम यांच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून,या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- Advertisement -

