Friday, July 31, 2026
Homeमुंबईआता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

आता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा सपाटा सुरू करून मुंबई,नवी मुंबई,पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा, नाशिक, बीड,जालना,नांदेड,परभणी,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर,अमरावती,अकोला,वाशिम,नागपूरसह  अनेक जिल्ह्यांतील विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत गूळ,खवा,बुंदी लाडू,बेकरी पदार्थ,कँडी,खाद्यतेल,तूप,खजूर,आईस्क्रीम,फ्रोजन डेझर्ट,मसाले,शेंगदाणा चिक्की आदी पदार्थांची तपासणी केली होती.या कारवाईत तब्बल ८४ हजार ३३५ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.या जप्त मालाची किंमत सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये असून संशयित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले गेले आहेत.त्याचबरोबर,पुण्यात ३ ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ आढळली आहे. त्यामुळे गुळाचा १५ हजार ९६ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.तसेच नवी मुंबईत आंबा विक्रीसाठी रासायनिक द्रव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आले आहे.यामध्ये २९ लाख २२ हजार ५७० रुपये किंमतीचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.काही ठिकाणी अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग उघड करण्यात आले आहेत. अश्यातच तुकाराम मुंडे आता ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींवर अधिक कडक कारवाई करणार आहेत.चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी कलाकारांवरही कारवाई केली जाईल.ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिरातींमुळे अनेक नागरिक आर्थिक नुकसान सोसतात.काही कंपन्या उत्पादनांबाबत दिशाभूल करणारे दावे करून ग्राहकांना आकर्षित करतात.अशा जाहिरातींमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग असल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक वाढतो.त्यामुळे अशा जाहिरातींची जबाबदारी केवळ कंपन्यांवरच नव्हे तर त्यांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींवरही निश्चित केली जाणार आहे.ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुंढे यांनी नमूद केले.डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याची माहिती तपासून पाहावी आणि संशयास्पद जाहिरातींबाबत संबंधित यंत्रणांकडे तक्रार करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!