Tuesday, June 2, 2026
Homeमुंबईअखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

अखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे.आज, मंगळवार २ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.मात्र,राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णयाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही.कर्जमाफी संदर्भात सहकार विभागाकडून अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे.या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती.या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.दोन लाखापर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्सानपर निधी देखील दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. – शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रहपुरी शहराच्या जानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा आंघोळीसाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

आता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा...

राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे कपात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.पण,सरकारने स्पष्ट केले...

हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढणारी बातमी; गॅस सिलेंडर आणखी झाला महाग..

उद्रेक न्युज वृत्त :-हॉटेल व्यावसायिकांसाठी केवळ चिंता वाढणारीच बातमी नाही,तर त्यांच्या व्यवसायावर तसेच आर्थिक बाबींवर महागाईचा दबाव वाढून कंबरडे मोडण्याचा खेळ सुरू झाल्याचे चित्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!