Monday, September 7, 2026
Homeमुंबईउद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे.याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल,मात्र विदर्भातील काही भागांमध्ये,प्रामुख्याने पूर्व विदर्भात कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील.आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही,कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही.सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.त्यामुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन केले की,संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी:
  • शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
  • विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.अशा वेळी झाडाखाली,टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर,वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!