Sunday, May 31, 2026
Homeचंद्रपूरतरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड येथे उघडकीस आली.सचिन सुरेश कुथे वय ३६ वर्षे, रा.जिजामाता वॉर्ड,वरोरा,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ते सिव्हील कॉन्ट्रॅक्टर होते.
सकाळचे आठ वाजले तरीही सचिन झोपेतून जागा झाला नसल्याने त्यांची आई त्यांना उठविण्यासाठी खोलीत गेल्या असता सचिन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.समोरील दृश्य पाहून आईने हंबरडा फोडताच कुटूंबीय तसेच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.लागलीच सदर घटनेची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेनासाठी वरोरा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला.आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सचिन कुथे यांच्या पश्चात पत्नी,दोन वर्षाचा मुलगा आणि अवघ्या सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.घटनेने कुथे परिवार शोकसागरात बुडाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!