Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीदेसाईगंज तालुक्यातील हत्तींचा कळप आरमोरी तालुक्यात दाखल..

देसाईगंज तालुक्यातील हत्तींचा कळप आरमोरी तालुक्यात दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-मागील काही दिवसांपासून देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव, डोंगरगाव व पिंपळगाव परिसरात वास्तव्यास असणाऱ्या जंगली हत्तींनी आता आरमोरी तालुक्यात दाखल होत पळसगांव,मंजेवाडा,शंकरनगर व परीसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर आता आरमोरी तालुक्यात जंगली हत्तींनी हैदोस माजविला आहे.जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या डोंगरगाव (हलबी)मार्गाने आरमोरीच्या पळसगांव परिसरात दाखल होत शेतकऱ्यांचे धान,भाजीपाला व साहित्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.हत्तींच्या कळपात जवळपास २८ हत्तींचा काफिला असल्याची माहिती आहे.अश्यातच नुकतेच २६ मे रोजी हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि  संभाव्य धोका टाळण्यासाठी हत्तींना कॉलर आयडी लावण्याचे व हत्ती नागरी वस्ती पासून पाच किलोमीटरच्या परिसरात आल्यास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वेळीच इशारा देण्यासाठी ‘अलर्ट ॲप’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.यासोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी टेहळणी बुरुज (वाॅचटावर) उभारून सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!