Friday, June 19, 2026
Homeनागपूरअजब मोलकरणीचा गजब कारनामा; प्रियकरासाठी चोरल्या हिऱ्याच्या अंगठ्या..

अजब मोलकरणीचा गजब कारनामा; प्रियकरासाठी चोरल्या हिऱ्याच्या अंगठ्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपला प्रियकर खुश रहावा.त्याला कुठलीही अडचण भासता कामा नये,यासाठी घरकाम करणाऱ्या मोलकरणीने चक्क प्रियकरासाठी दोन हिऱ्याच्या अंगठ्या चोरल्याची घटना आज,बुधवारी २८ मे रोजी उघडकीस आली.सदरची घटना ही नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे घडली होती.प्रकरणी आज बुधवारी ३० वर्षीय मोलकरीण मारिया सूर्यराव सुक्का हिला पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तीच्या प्रियकराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
मारिया हि नागपूरच्या विनायक नगरातील नुपूर अग्रवाल यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची.१८ मे रोजी नुपूर अग्रवाल या घरी एकट्याच होत्या.त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर दोन हिऱ्याच्या अंगठ्या काढून ठेवल्या होत्या.मारीया हिने अंगठ्या पहिल्या असता संधीचा फायदा घेत हिऱ्याच्या दोन्ही अंगठ्या चोरून नेल्या.दरम्यान,ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या दिसत नाही; असे माहित पडल्यानंतर दुसरीकडे मारिया हिने नुपूर अग्रवाल यांना पन्नास हजार रुपये मागितले होते.यानंतर ती कामावर सुद्धा गेली नाही.मात्र अंगठ्या सापडून येत नसल्याने नुपूर यांना मारीया हिनेच अंगठ्या चोरल्याचा संशय आला.या संदर्भात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. जरीपटका पोलिसांनी शोध घेतला असता मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेल्याची माहिती मिळाली.यानंतर पोलिसांनी पश्चिम बंगालला पथक पाठवत मारियाला अटक केली.त्यावेळी तिला विचारपूस केली असता तिने हिऱ्याच्या अंगठ्या तिचा प्रियकर पवन भास्कर याला दिल्याची कबुली दिली.पवन भास्कर हा मुळचा नाशिकचा असून त्याचे मारियासोबत प्रेम प्रकरण होते.पवन पैसे मागत असल्याने त्या दबावात तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याच्या अंगठ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!