- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सध्या स्थितीत हा घोटाळा,तो घोटाळा व नानाविध घोटाळे ऐकले.पण शेणखतातही घोटाळा. रोपवनात शेणखत न टाकताच ३२ लाख ६८ हजारांची खरेदी दाखविण्यात आली.प्रकरणी चौकशी झाली आणि वन परिक्षेत्र अधिकारी निलंबित झाला. सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात घडली.सुरेश येलकेवाड असे निलंबित झालेल्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे.इतर दोन वनपाल व सहा वनरक्षकांना विभागाबाहेर बदली व महाराष्ट्र नागरी सेवा कलम १९७९ नियम आठनुसार शिस्तभंगाची कारवाई केली.चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने संबंधितांकडून रक्कमही वसूल करण्यात आली.विरूर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड केल्यानंतर वाढीसाठी शेणखत टाकले जाते.मात्र,मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर २०२४ मध्ये शेणखत खरेदी केल्याची बतावणी करुन तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी नियमाला बगल दिली.कॅम्पा योजनेंतर्गत सन २०२३-२४ मध्ये परिक्षेत्रात प्रत्यक्षात शेणखत खरेदी व गवत रोपवनात शेणखत मिसळण्याची कामेच केली नाही.अधिनस्थ वनपाल व वनरक्षक यांच्याशी संगनमत करून कामाची बनावट देयके तयार केली व ३२ लाख ६८ हजार ६०८ रुपयांचा घोटाळा केला.त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी चौकशी समिती गठित करण्याचा आदेश दिला. उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी चौकशी करून ४ एप्रिल २०२५ रोजी मुख्य वनसंरक्षकांकडे अहवाल सादर केला.चौकशीत दोषी आढळल्याने वन विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,दोन वनपाल,सहा वनरक्षकांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल केली. मात्र,मुख्य आरोपी वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नव्हती.त्यामुळे मुख्य वनसंरक्षकांनी अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.इतर दोन वनपाल,सहा वनरक्षकांना विभागाबाहेर बदली व महाराष्ट्र नागरी सेवा कलम १९७९ नियम आठनुसार शिस्तभंगाची कारवाई केली
- Advertisement -

