Thursday, August 6, 2026
Homeचंद्रपूरडाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे देण्यास सांगताच चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.मोहन चंद्रकांत शेट्टीवार वय ४० वर्षे,पद-दुय्यम निबंधक(श्रेणी-१)कार्यालय-दुय्यम निबंधक,मुद्रांक नोंदणी विभाग,चंद्रपूर व त्याचा खासगी डाटा एन्ट्री ऑपरेटर या दोघांना काल मंगळवारी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की,प्रकरणातील  तक्रारदार यांनी त्यांचे पक्षकार यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील मालमत्तेची नोंदणी होण्याकरीता दुय्यम निबंधक कार्यालय चंद्रपूर येथे कागदपत्रे सादर केली असता मोहन शेटट्टीवार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय चंद्रपूर येथे दस्तऐवजाची नोंदणी केली. त्याबदल्यात त्यांचे ऑपरेटर मार्फत ४ हजार रूपये लाचेची मागणी केली.परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी मंगळवार १६ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपुर येथे प्रत्यक्ष हजर होऊन तक्रार दिली.तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून काल मंगळवारी मोहन शेटट्टीवार, दुय्यम निबंधक यांची पंचासमक्ष पडताळणी व सापळा कारवाई केली असता त्यांनी तक्रारदार यांचे पक्षकार यांच्या मालमत्तेच्या दस्तऐवजाची नोंदणी करून दिल्याचा मोबदला म्हणून ४ हजार रूपये लाचेची मागणी करून त्यांचे ऑपरेटर मार्फत स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ अटक करून पुढील तपास कार्य सुरू केले आहे.
सदरची कार्यवाही डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, श्रीमती माधुरी बावीस्कर अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर यांचे मार्गदर्शनात अनिल जिट्टावार, पोलीस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार व सापळा पथक पो.हवा.हिवराज नेवारे,रविकांत इंगळे,विजेंद्र वाढई,पो.शि.अमोल सिडाम,राकेश जांभुळकर,प्रदिप ताडाम,सचिन गजभिये,महेश माहुरपवार,म.पो.शि.मेघा मोहुर्ले,चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,चंद्रपूर व चापोशि/संदिप कौरासे,मो.प.वि.चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
  • नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन👇
कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम(एजंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर👇
अनिल जिट्टावार,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि. चंद्रपूर :-९८२३२७०५८१
सचिन धर्मेजवार,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. चंद्रपूर
:-९६२३०५५६५५
टोल फ्री क्रमांक- १०६४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!