- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे आणलेली रेती खाली करण्यासाठी ट्रॉलीचा मागील हुक काढत असतांनाच घडलेल्या अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २ जून रोजी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्याच्या सामदा गावात घडली.धीरज भास्कर बोरकर वय २३ वर्षे, रा.टेकरी,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
सामदा गावातील गुलाब नाथ यांच्या घरानजीक बांधकामासाठी रेती लागत असल्याने धीरज बोरकर व त्याच्या सहकाऱ्याने ट्रॅक्टरद्वारे रेती आणली होती.रेती खाली करण्यासाठी धीरज ट्रॉलीचा मागील हुक काढायला गेला.हुक काढत असतांनाच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मागे सरकला आणि तो त्यात दबला गेला.यात धीरजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवला.घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

