- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, अशी लेखी मागणी केली होती.या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथे २ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे.यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून प्रथम शेतीचे दर तसेच अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करावी,अशी मागणी केली.भंडाराहून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या शीघ्रसंचार दृतगती महामार्गात भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे.यात भंडारा व पवनी तालुक्यातील प्रत्येकी दहा तर लाखांदूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.
प्रमुख मागण्या👇
समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीला प्रतिएकर १ कोटी ३० लाख रुपये भाव मिळावा,अशी या शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे.जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १३२१ शेतकरीही याच मागणीवर ठाम असल्याचे सांगण्यात येतेय.महामार्गात शेतजमिन गेलेल्या मालकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे.समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीच्या मालकांना प्रति महिना ३० हजार रुपये पेन्शन मिळावी,अश्या मागण्या घेऊन आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात,यासाठी लाखांदूर तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले होते.मात्र,त्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने समृद्धी महामार्गातील पीडित शेतकरी विनोद ढोरे यांच्या नेतृत्वात प्रभू मेंढे,जयपाल भांडारकर,व्यंकट बेडेकर, जनार्दन भांडारकर,शिशुपाल भांडारकर,शीतल भांडारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
- Advertisement -

