Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंज'तु माझ्याशी कां बोलत नाही'.! म्हणत अल्पवयीन प्रेयसीने हाताची नस कापली.. -देसाईगंज...

‘तु माझ्याशी कां बोलत नाही’.! म्हणत अल्पवयीन प्रेयसीने हाताची नस कापली.. -देसाईगंज तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-हल्ली अल्पवयीन मुला- मुलींचे प्रेम-प्रकरण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चांगलेच बहरून येऊ लागल्याच्या घटना सर्वत्र उघडकीस येत आहेत.अनेकजण प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणीत पळून जाणे,आत्महत्या करणे व नाना तऱ्हेचे प्रेमाच्या आणाभाका टाकून टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशातच एका अल्पवयीन मुलीने ‘तु माझ्याशी कां बोलत नाही’.! असे म्हणीत चक्क आपल्या डाव्या हाताची नस कापल्याची घटना काल,सोमवारी ३ मार्चला देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात दुपारच्या सुमारास घडली असून आज,मंगळवारी उघडकीस आली.वेळेवर उपचार झाल्याने १४ वर्षीय तरुणी थोडक्यात बचावली आहे. मात्र,नस कापलेल्या हाताच्या जागेवर बारा टाके लागल्याची माहिती आहे.दोघेही प्रेमी हे अल्पवयीन तसेच शालेय शिक्षण घेत असल्याने पोलीस कारवाई टाळण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढाळा गावातील
१४ वर्षीय तरुणी आणि १६ वर्षीय तरुणाचे बऱ्याच दिवसांपासून प्रेम बहरून येत आहे.प्रेमात रुसवे-फुगवे हे सुरूच असतात.सर्वकाही सुरळीत सुरू असतांना तरुणाने काही कारणास्तव प्रेयसीशी बोलणे बंद केले.
अशातच काल सोमवारी आपला प्रियकर कां बोलत नाही म्हणून तरुणीने प्रिकरास भेटण्याचा बेत आखला.भेटी दरम्यान ‘तु माझ्याशी कां बोलत नाही’.! ‘मी तुझ्यासाठी जीव देतो’ म्हणीत गावातील एका दुकानातून एक रुपयाचा ब्लेड घेऊन प्रियकरासमोरच डाव्या हाताची नस कापली.नस कापताच रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.घडलेला प्रकार पाहून काहीकाळ रुग्णालयातील डॉक्टरांचीही तारांबळ उडाली. डॉक्टरांनी लगेच उपचार करून जखमेवर बारा टाके लावले.त्यातच एका सामाजिक कार्यकर्त्याने मध्यस्थी करीत सदर प्रकरण पोलिसांत जाऊ नये, याकरीता प्रयत्न केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!