उद्रेक न्युज वृत्त :-बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.त्यातच सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर आज,मंगळवार ४ मार्चला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या पीए व ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.
अखेर धनंजय मुंडेंनी मंत्री पदाचा दिला राजीनामा..! – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

