- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उचली गाव परिसरातील टॉवरला रविवारी २ मार्च रोजी गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय १४ वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय २५ वर्षे,रा.उचली, ता.ब्रम्हपुरी या प्रेमींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.अशातच आता आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे आली आहे.गायत्री व रोहित यांचे प्रेमप्रकरण बहरून येऊ लागले होते.त्यातच दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या आईला लागल्याने १५ दिवसाआधी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती.पोलिसांनी दोन्ही प्रेमींना ठाण्यात बोलावून समजूत काढली होती. दरम्यान,तीन ते चार वेळा दोघांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.घटनेच्या आधी शुक्रवारी २८ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान दोघेही घरून जंगलाच्या दिशेने निघून गेले होते.सदरची बाब मुलीच्या आईच्या लक्षात येताच,शनिवार १ मार्चला सकाळी पोलिसांत मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली होती.ही बाब गावातील काही नागरिकांच्या लक्षात आल्याने प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला.मात्र,दोन्ही प्रेमी रविवारी २ मार्चला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने आत्महत्या की हत्या?अशी कुजबुज गाव परिसरासह तालुक्यात सुरू आहे.
- Advertisement -

