Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीसिरोंचा येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा संपन्न..

सिरोंचा येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा शहरातील मॉडेल इंग्लिश मीडियम विद्यालय या ठिकाणी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा नुकताच संपन्न झाला.
शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत असताना, शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरतो.शिक्षकांना अध्यापन कौशल्ये सुधारण्यासाठी नवे तंत्रज्ञान, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी सदर प्रशिक्षण दिले जाते.राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP २०२०) अंतर्गत शिक्षकांना डिजिटल शिक्षण,समावेशक शिक्षण आणि नवोपक्रमाधारित अध्यापन यासारख्या विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना अध्यापन कौशल्यात वाढ होऊन शिक्षणाची गुणवत्ता सुधारते.विद्यार्थी सहभागी होण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी बनते.तांत्रिक साधनांचा उपयोग करून शिक्षण अधिक सुलभ आणि प्रभावी होते.त्यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढते.
प्रसंगी नीलकंठम दोन्थुला गट शिक्षण अधिकारी सिरोंचा यांनी म्हटले की,शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हा शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.यामुळे केवळ शिक्षकांचे कौशल्य विकसित होत नाही,तर विद्यार्थ्यांना सुद्धा उत्कृष्ट आणि समृद्ध शिक्षण मिळते.त्यामुळे,अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे अधिकाधिक आयोजन होणे गरजेचे आहे.तसेच  शेषराव नागमोती आकांक्षित तालुका समन्वयक पंचायत समिती सिरोंचा यांनी प्रशिक्षणात असलेल्या शिक्षकांना आकांक्षीत तालुका कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या शिक्षण विभागाचे निर्देशांकाबद्दल माहिती दिली आणि निर्देशांक ध्येयपूर्तीसाठी प्रात्यक्षिक स्वरूपात एका खेळाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविले.
सदर प्रशिक्षण प्रसंगी नीलकंठम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिरोंचा,राठोड गट समन्वयक गट साधन केंद्र,टेकूल शिक्षण विस्तार अधिकारी,शेषराव नागमोती आकांक्षीत तालुका समन्वयक पंचायत समिती सिरोंचा,मरसकोल्हे प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा,मंजुळा बंदेला नेसकाम फाउंडेशन प्रतिनिधी तथा विविध मान्यवर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!