Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूर'माझी पत्नी प्रयागराजला गेली आहे,तू घरी ये,एक हजार रुपये देतो; शिक्षकाचा कारनामा..!...

‘माझी पत्नी प्रयागराजला गेली आहे,तू घरी ये,एक हजार रुपये देतो; शिक्षकाचा कारनामा..! – विद्यार्थिनीच्या वडीलांसह भावाने घर गाठत शिक्षकास बदडवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र मानले जाते.मात्र,मागील काही वर्षांमध्ये या नात्यामध्येही काही शिक्षकांकडून काळिमा फासण्याचा प्रयत्न केला जात आहे.एखादा शिक्षकच नात्याला काळिमा फासून वाईट कृत्य जर कां करीत असेल तर आई-वडिलांनी मुलांना शाळेत पाठवणे सोडावे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चक्क एका शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज पाठवल्याने विद्यार्थिनीचे वडील तसेच भावाने थेट शिक्षकाचे घर गाठून चांगलेच बदडवले.बदनामी होईल,या भीतीने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत
तक्रार देण्याचे टाळले.
माहितीनुसार,शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीला मोबाइलवर ‘माझी पत्नी प्रयागराजला गेली आहे,तू घरी ये,एक हजार रुपये देतो’, असा मॅसेज केला.हा मॅसेज येताच तिने आपल्या कुटुंबीयांना दाखविला. शिक्षकाकडून असा मेसेज येणे अपेक्षित नसल्याने वडिलांसह भावाचाही पारा चढला आणि त्यांनी थेट शिक्षक राहत असलेल्या शहरातील ले-आउटमध्ये जाऊन शिक्षकाचे घर गाठले.त्यानंतर याबाबत जाब विचारण्यात आला.एवढेच नाही तर शिक्षकाला चांगलेच झोडपले.शिक्षक राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी सदरचा प्रकार पाहून सर्वजण अवाक् झाले.विशेष म्हणजे,यापूर्वीही याच शिक्षकाने एका विद्यार्थिनीची छेडछाड केली होती. याबाबतची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती.तेव्हा शाळा व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले होते.मात्र तरीही शिक्षकाने न सुधारता आपल्या विद्यार्थिनीली मॅसेज करून घरी बोलावले.त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!