- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने शहरातील थकीत व चालू करधारकांना कर भरण्याची सुचना देण्यात आली होती.त्यानुसार काही मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी कराचा भरणा केलेला आहे.अशातच आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस उरलेले असतांनाही काही नागरीकांनी अजुनही नगर परिषदेकडे कराचा भरणा केलेला नाही.नगर परिषदेच्या वतीने सर्वात जास्त मालमत्ता व पाणीपट्टी कर थकीत असणाऱ्या एकूण २५ थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असुन यातील आज,मंगळवार ४ मार्चला नगर परिषदेच्या कर विभागाद्वारे एकुण ३ मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे.तसेच पाणीपट्टीकर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
शहरातील नागरिकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कर आकारणी करण्यात येते.अशातच सुविधांचा लाभ घेणारे अनेकजण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आल्याने देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांचे मार्गदर्शनात थकीत मालमत्ता व पाणीपट्टीकर वसुलीसाठी शहरात विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.सदर कर वसुली पथकामध्ये कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने, कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार,दिनकर खेत्रे,मुकेश सोनेकर,राहूल रगडे,शितल सोनेकर,योगेंद्र सोनेकर तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता आशिष गेडाम,घनश्याम कांबळे,अमर शेंडे, अनुराग बिरहा,सत्यवान कोडाप इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दोन टक्के प्रति महिन्याप्रमाणे शास्ती👇
थकीत व चालू मालमत्ता कराचा भरणा न केल्यास नळ कनेक्शन बंद,शासकीय कागदपत्रे मिळण्यापासून वंचित,प्रत्येक वार्डातील थकीत करदात्यांवर जप्तीची कारवाई,तसेच कर न भरल्यास दोन टक्के प्रति महिन्याप्रमाणे शास्ती आकारण्यात येणार आहे. थकीत रक्कम जप्ती बाबत नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १५२ ते १५६ नुसार करवाई करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे थकबाकीदारांची नावे कुठलीही पूर्वसूचना न देता डिजिटल फलकावर जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याने थकीत कर धारकांनी वेळीच कराचा भरणा करावा; असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी केले आहे.
- Advertisement -

