- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गावशेजारील परिसरात सायंकाळच्या सुमारास शौचास गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करून मारहाण केल्याने तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आल्याची घटना रविवारी २ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली तालुक्याच्या चामोर्शी मार्गावरील शिवणी गावात उघडकीस आली.प्रकरणी अज्ञात इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असावा,असा प्राथमिक अंदाज गडचिरोली पोलिसांनी व्यक्त केला होता.अशातच आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे.नराधमाने तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेत फरफटत ओढत नेऊन तिला अमानुष मारहाण केली.त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार (बलात्कार)केला.आरोपीला गडचिरोली पोलिसांनी काल,मंगळवारी ४ मार्चला अटक केली आहे.अनिल संतू उसेंडी वय २३ वर्षे, रा.दोबे,ता.ओरछा,छत्तीसगड असे आरोपीचे नाव असून तो शिवणीतील एका शेतात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता.
गडचिरोली तालुक्याच्या शिवणी गावातील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली २३ वर्षीय तरुणी रविवारी २ मार्चला सायंकाळी गावशेजारील परिसरात शौचास गेली होती.परंतु बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,ती रस्त्याच्या कडेला शेतात बेशुध्दावस्थेत आढळून आली.अशातच तरुणीच्या डोळ्याखालील भागावर व्रण तसेच शरीरावर जखमा दिसून आल्याने तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.गडचिरोली रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्यात आले होते.त्यानुसार गडचिरोली ठाण्याच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी सोमवारी ३ मार्चला नागपूरला जाऊन तिचा जबाब नोंदविला. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात बीएनएस कलम ६४ (१), ६४ (२) (एल), ११५ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी तपासचक्रे गतिमान करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.पीडितेवर नागपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर आहे.
- Advertisement -

