Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरकाँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश.. - विजय वडेट्टीवार काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या चर्चांना...

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश.. – विजय वडेट्टीवार काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या चर्चांना उधाण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्याच्या राजकीय क्षेत्रात कधी काय होणार? हे सांगताच येत नाही.काँग्रेस पक्षातील मंडळी भाजपात तर कुणी राष्ट्रवादी कांग्रेस(अजित पवार गट)पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू असतांनाच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक ब्रम्हपुरी नगर परिषदेचे गटनेते विलास विखार,माजी उपाध्यक्ष डॉ. सतिश कावळे,गौरव अशोक भैय्या,माजी सभापती नामदेव लांजेवार,सुरेश दुर्वे,सुकदेव खेने,स्वप्नील सावरकर,मोहन वैध,बन्सीलाल कुर्जकार,निलेश चिंचुरकर आदि महत्वाच्या कांग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला.त्यामुळे ब्रम्हपुरी काँग्रेसमध्ये उभी फुट पडून ब्रम्हपुरी कांग्रेसला मोठा झटका बसला आहे.अशातच आमदार विजय वडेट्टीवार काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.त्यामुळे वडेट्टिवार राष्ट्रवादी कांग्रेस की समर्थकांच्या बरोबरीने भाजपात जाणार वा कांग्रेसमधेच राहणार अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.माजी मंत्री विजय वडेट्टिवार गेल्या पाच वर्षांपासून सत्तेच्या दुर असल्याने नाराजीचा सुर उमटू लागला आहे.त्यातच चर्चेतील विषयानुसार,काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरीत आमदारासोबत भाजपात गेलेले महत्वाचे कार्यकर्ते यांच्यात बैठक पार पडली.यात आपण राष्ट्रवादी कांग्रेस(अजित पवार)गटात जायचे ठरले,परंतु कांग्रेसच्या काही नेत्यांनी चक्क नकार दिला.त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा भाजपा बरी म्हणुन आमदार विजय वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक विलास विखार सहीत महत्वाचे एकंदरीत ९ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून भाजपाचा दुप्पटा बांधला.आमदार वडेट्टिवार मात्र सध्यातरी भाजपात गेले नाहीत.त्यांची राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटात जाण्याची इच्छा होती असे बोलल्या जाते.महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट) धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.तर मानिकराव कोकाटे हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.अशातच आमदार विजय वडेट्टिवार आमदारकीचा राजीनामा देऊन मागच्या दारातुन विधान परिषदेचे आमदार बनुन मंत्री बनण्याचे कदाचित स्वप्न असावे अशी कुजबूज सर्वत्र सुरू झाली आहे.कारण सत्तेशिवाय राजकारण नाही व पुढील १० वर्षे कांग्रेसचे काही खरे नाही असे म्हटले जात आहे.ब्रम्हपुरी नगर परिषदचे गटनेते विलास विखार,गौरव अशोक भैय्या सहीत जवळपास महत्वाचे कांग्रेसचे ९ कार्यकर्त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्यालयीन प्रभारी रविंद्र अनासपूरे,आमदार बंडी भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!