- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडाराच्या जवाहरनगर स्थित आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्ट्री) आरकेआरच्या बँच सेक्शनमध्ये आज,शुक्रवार २४ जानेवारीला सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण स्फोट होऊन कारखान्याचे छत कोसळल्याने १३ कामगार ठार झाल्याची बातमी समोर आली आहे.स्फोट इतका भीषण होता की,त्यात संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली.आणखी कामगार ठार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे.जवाहरनगर स्थित ऑर्डनन्स फॅक्ट्रीच्या आरकेआरच्या ब्रँच सेक्शनमध्ये आरडीएक्स (RDX) तयार करण्याचे काम केले जाते.
कारखाना परिसरात रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवण्यात येत असल्याची माहिती भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे.आयुध निर्माण कंपनीत झालेला स्फोट एवढा भीषण होता की,जवाहर नगर परिसरातील जवळपासच्या डझनभर गावांना याचा फटका बसला.सध्या कंपनीचे मुख्यद्वार सील करण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांनी गेट जवळ एकच गर्दी केली आहे.हे सर्वजण रात्रपाळीत कंपनीत कामाला गेलेले आपले नातलग सुखरूप आहेत की नाही? याची विचारणा करत आहेत.सध्यास्थिती कंपनी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.स्फोट झालेल्या कारखान्यात चाचणी सुविधा व आधुनिक प्रयोगशाळा आहे.याठिकाणी भारतीय लष्करासाठी अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात.यात ॲसिडपासून अनेक प्रकारच्या स्फोटकांचा समावेश आहे.या स्फोटात ही चाचणी सुविधा व प्रयोगशाळेचे काही नुकसान झाले का? हे तपासले जात आहे.
- Advertisement -

