Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरगाडीवर झेप घेणार इतक्यातच दुचाकीचा वेग वाढविल्याने मोठा अनर्थ टळला..!

गाडीवर झेप घेणार इतक्यातच दुचाकीचा वेग वाढविल्याने मोठा अनर्थ टळला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघ असो की बिबट्या अमुक माझा नातेवाईक हो..तमुक माझा नातलग हो..हे कधीच बघत नसतात.त्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला हा हल्लाच असतो.अश्याच प्रकारची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्याच्या नाचनभट्टी शिवारात उघडकीस आली आहे.चक्क वाघाने धावत्या दुचाकीवर झडप घातल्याने दुचाकीस्वाराचा काळजाचा ठोका धडधडला.सदरची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारच्या सायंकाळी घडली.
अधिक माहिती अशी की,सिंदेवाही तालुक्याच्या इंदिरानगरातील रहिवासी स्वप्नील चौधरी हे नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता इंदिरानगरातून आपल्या मुलासाठी दूध आणण्यास दुचाकीने स्मशानभूमीमार्गे नाचनभट्टीकडे जात होते.त्यातच अचानक स्मशानभूमी परिसरातून एक पट्टेदार वाघ दुचाकीकडे धावत आला.गाडीवर झेप घेणार इतक्यातच स्वप्नील यांनी प्रसंगावधान साधत दुचाकीचा वेग वाढविला.वेग वाढविल्याने वाघ दोन-चार फुटांच्या अंतराने मागे पडल्याने ते थोडक्यात बचावले.महत्वाचे म्हणजे,यापूर्वी रत्नापूरचे डॉ.हर्षद रामटेके,नाचनभट्टीचे नत्थूजी चौधरी,उमरवाहीचे धनराज बोरकर यांच्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेतल्याची घटना घडली होती.अशा घटना परिसरात वारंवार घडत असल्याने विद्यार्थी व दुचाकीधारकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!