Wednesday, June 3, 2026
Homeभंडारामोठी बातमी आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट; १३ कामगार ठार झाल्याची बातमी;...

मोठी बातमी आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट; १३ कामगार ठार झाल्याची बातमी; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडाराच्या जवाहरनगर स्थित आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्ट्री) आरकेआरच्या बँच सेक्शनमध्ये आज,शुक्रवार २४ जानेवारीला सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण स्फोट होऊन कारखान्याचे छत कोसळल्याने १३ कामगार ठार झाल्याची बातमी समोर आली आहे.स्फोट इतका भीषण होता की,त्यात संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली.आणखी कामगार ठार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे.जवाहरनगर स्थित ऑर्डनन्स फॅक्ट्रीच्या आरकेआरच्या ब्रँच सेक्शनमध्ये आरडीएक्स (RDX) तयार करण्याचे काम केले जाते.
कारखाना परिसरात रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवण्यात येत असल्याची माहिती भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे.आयुध निर्माण कंपनीत झालेला स्फोट एवढा भीषण होता की,जवाहर नगर परिसरातील जवळपासच्या डझनभर गावांना याचा फटका बसला.सध्या कंपनीचे मुख्यद्वार सील करण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांनी गेट जवळ एकच गर्दी केली आहे.हे सर्वजण रात्रपाळीत कंपनीत कामाला गेलेले आपले नातलग सुखरूप आहेत की नाही? याची विचारणा करत आहेत.सध्यास्थिती कंपनी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.स्फोट झालेल्या कारखान्यात चाचणी सुविधा व आधुनिक प्रयोगशाळा आहे.याठिकाणी भारतीय लष्करासाठी अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात.यात ॲसिडपासून अनेक प्रकारच्या स्फोटकांचा समावेश आहे.या स्फोटात ही चाचणी सुविधा व प्रयोगशाळेचे काही नुकसान झाले का? हे तपासले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!