- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून आज,शुक्रवार २४ जानेवारी पासून दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.काही महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले असून उर्वरित महिलांच्या खात्यात येत्या २६ जानेवारी पर्यंत रक्कम जमा होणार आहे.नुकतेच राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात सांगितले होते की,लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ तारखेपूर्वीपासून मिळणार असून सरकारने त्यासाठी ३,६९० कोटी रुपये महिला व बालविकास
विभागाकडे सुपूर्द केले आहेत व राज्याचा अर्थसंकल्प मांडून बजेटनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात २,१०० रुपये जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे सध्या स्थितीत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे.
- Advertisement -

