Wednesday, August 5, 2026
Homeआरमोरीरोजगार हमीचे काम करतांना भोवळ येऊन मजुराचा मृत्यू...

रोजगार हमीचे काम करतांना भोवळ येऊन मजुराचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-रोजगार हमी योजनेअंतर्गत
जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मजूरांद्वारे कामे केली जात आहेत.अशातच आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी शिवारात रोजगार हमीचे काम करतांना भोवळ येऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवारी २१ जानेवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. जीवन रामा नेवारे वय ५८ वर्षे,रा. देलनवाडी,ता.आरमोरी असे मृताचे नाव आहे.
गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळावा; यासाठी रोजगार हमीच्या माध्यमातून गाव शिवारात विविध कामे केली जातात.त्यानुसार रोजगार हमीच्या अकुशल कामांतर्गत देलनवाडीच्या शेतशिवारात मजगीचे मातीकाम सुरू आहे.यावर जीवन नेवारे हे १७ जानेवारीपासून काम करीत होते.काल मंगळवारी  काम करीत असतांनाच त्यांना अचानक भोवळ आली आणि जमिनीवर कोसळले.त्यातच जवळच काम करणाऱ्या मजुरांनी जीवन यांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.मात्र,तपासणी अंती आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सुपारे यांनी मृत घोषित केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!