Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंज'त्या' मुलाचे अपहरण नसून केवळ अफवा; देसाईगंज शहरातील प्रकार.. - सोशल मीडियावर...

‘त्या’ मुलाचे अपहरण नसून केवळ अफवा; देसाईगंज शहरातील प्रकार.. – सोशल मीडियावर संदेश टाकण्यापूर्वी सत्यता तपासून घ्यावी- अजय जगताप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज हरात दोन दिवसांपूर्वी एका १४ वर्षीय मुलाचे चार ते पाच जणांनी शहरातून अपहरण केल्याची बातमी सोशल मीडियावर वायरल होत मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसारित करण्यात आल्या.त्यानुसार देसाईगंज पोलिस प्रशासनाकडून वायरल बातमीची सत्यता समोर आली आहे. ‘त्या’ मुलाचे अपहरण नसून केवळ अफवा असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,देसाईगंज शहराच्या हनुमान वॉर्ड येथील चंद्रकुमार रेखमप्रसाद दुबे यांचा १४ वर्षीय मुलगा श्रेयस दुबे याचे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार दिनांक-१६ जानेवारी २०२५ ला देसाईगंज शहरातून अपहरण केल्याचे सोशल मीडियावर मॅसेज वायरल करून त्यात अज्ञात ४ ते ५ अपहरणकर्ते यांनी मुलाला गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने अपहरण करून रेल्वेने पळवून नेत असतांना चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह येथे सदरच्या मुलाची सुटका करण्यात आली असा मजकूर प्रसारित करण्यात आलेला होता. त्यानुसार सोशल मीडिया,दैनिक वृत्तपत्रे तसेच पोर्टल यावर बातम्या प्रसारित झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.त्यामुळे देसाईगंज पोलीस प्रशासन ॲक्क्षन मोडवर आले.काल,शुक्रवार १७ जानेवारीला देसाईगंज(वडसा)पोलीसांनी दिवसभर केलेल्या चौकशी दरम्यान असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे निष्पन्न झाले असून सदरचा मुलगा हा रागाच्या भरात देसाईगंज रेल्वे स्टेशन येथून ट्रेनने बल्लारशाह येथे गेलेला होता; परंतु नातेवाईक किंवा हितचिंतक यांचेकडून काळजीपोटी चुकीच्या पद्धतीने मॅसेज सोशल मीडियावर वायरल करण्यात आले.याबाबत खुद्द मुलाचे वडील चंद्रकुमार रेखमप्रसाद दुबे यांनी खुलासा सादर केलेला आहे. देसाईगंज शहर तथा परिसरात यापूर्वी देखील ३ वेळा मुलांच्या अपहणाबाबत अफ़वा पसरविण्यात आल्या असून सदरचा प्रकार हा त्यासारखाच आहे.सदरची मुले छोट्या-छोट्या कारणावरून घरून निघून गेलेली होती व थोड्याच वेळात ती पुन्हा मिळून आलेली आहेत.केवळ घरच्या लोकांच्या भीतीने त्यांनी अपहरणाच्या खोट्या कथा रचल्याचे तांत्रिक पुराव्यावरून स्पष्ट झालेले आहे.त्यामुळे देसाईगंज शहर किंवा परिसर येथे मुलांचे अपहरण करणारी अशी कोणतीही टोळी नसून नागरिकांनी विनाकारण अस्वस्थ होऊन घाबरू नये,आपणास असा काही संशयास्पद प्रकार दिसून आल्यास तात्काळ देसाईगंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच सोशल मीडियावर संदेश टाकण्यापूर्वी सत्यता तपासून घ्यावी; असे आवाहन देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!