Saturday, September 5, 2026
Homeगोंदियाआवाज वाढाव डीजे तुला आईची शप्पत हाय..! असे म्हणणाऱ्या डीजेवर कारवाई..

आवाज वाढाव डीजे तुला आईची शप्पत हाय..! असे म्हणणाऱ्या डीजेवर कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-डीजे म्हटला की,न थिरकणारेही डीजेच्या तालावर नाचू लागतात.नाच,गाणी ठीक आहे; परंतु यावर काही मर्यादाही असणे गरजेचे आहे.काहीजण मर्यादेपलीकडे जाऊन रात्री बेरात्री डीजे वाजवीत असतात.अश्याच प्रकारे रात्री डीजे वाजविण्यावर बंदी असतांनाही मोठ्या आवाजात डीजे वाजविणे एका डीजेवाल्याच्या अंगलट आले आहे.प्रकरणी त्याच्याविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारीला आदेश पारीत करून ठराविक वेळेनंतर डीजे वाद्य वाजविण्यावर आणि आवाजावरही बंदी घातली आहे.त्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. अशा तक्रारी आल्यास पोलिस डीजे मालकांवर कारवाई करीत आहेत.गोंदियानजीक असलेल्या चुलोद येथील घनश्याम पटले रा. चुलोद यांच्या घरी लग्नाच्या हळदीचे कार्यक्रम होते.त्या कार्यक्रमात बुधवारी १५ जानेवारीच्या रात्री १ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात येत होता.याची तक्रार पोलिसांकडे आली.पोलिसांनी तात्काळ चुलोद गाठून डीजे मालक ललीत ओमकार पतेह वय २५ वर्षे, रा. भानपूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून २५ हजार रुपये किंमतीचा एमप्लपायर मशीन आणि १५ हजार रुपये किंमतीचा डबलबेस जप्त केला.प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!