Sunday, September 6, 2026
Homeभंडारासरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर प्रकरणी महिला सरपंचा अपात्र...

सरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर प्रकरणी महिला सरपंचा अपात्र…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सरपंचपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून लाखांदूर तालुक्याच्या
दिघोरी मोठी येथील महिला सरपंचाला अपात्र घोषित करण्यात आले.सदरची कारवाई नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशावरून करण्यात आली. सुनीता संजय साळवे असे अपात्र महिला सरपंचाचे नाव आहे.
२०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत तहसीलच्या दिघोरी/मो. ग्रामपंचायतमध्ये सुनीता साळवे यांना थेट जनतेने सरपंचपदासाठी निवडून दिले होते.तर इतर १२ जण ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आले होते. एकंदरीत सरपंचासह १३ गावातील अधिकारी गेल्या वर्षभरापासून गावाचा कारभार बिनविरोध चालवत होते.गेल्या काही महिन्यांपासून सदस्यांची मान्यता न घेता स्वतःच्या मर्जीने कारभार करण्याचा आरोप करीत उपसरपंच व इतर सदस्यांनी याप्रकरणी नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करून महिला सरपंचाला सदस्यपदावरून अपात्र ठरवावे,अशी मागणी केली होती.त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले.या आरोपांसह भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांनी महिला सरपंचाला नियमबाह्य काम करण्यासह कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरविले.त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी महिला सरपंचाविरुद्ध आदेश काढून त्यांना सदस्यपदासह सरपंचपदावरून अपात्र घोषित केले.विद्यमान महिला सरपंचाला अपात्र घोषित करण्यात आले आहे.या स्थितीत रिक्त असलेला पदभार विद्यमान उपसरपंच विजय खोब्रागडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!