Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा क्षेत्रात 'चहापेक्षा केटली झाली गरम..!' -मतदारसंघातील चित्राबाबत विश्लेषकांनी बोलणे टाळले..

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ‘चहापेक्षा केटली झाली गरम..!’ -मतदारसंघातील चित्राबाबत विश्लेषकांनी बोलणे टाळले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्यात विधासाभा निवडणुकांचे बिगुल वाजले जरी असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहेत.अशातच ‘चहापेक्षा केटली गरम झाली’ असल्याचा प्रत्यय सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे.विधानसभा निवडणूक जाहीर होताच उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक हे सोशल माध्यमांवर सक्रिय झाले आहेत. सकाळी,दुपारी आणि रात्री समर्थकांकडून एखादी पोस्ट व्हॉटस्ॲपवर टाकली जाते आणि नंतर स्पर्धक उमेदवाराचे समर्थक सुध्दा त्यावर तिखट प्रतिक्रिया देतात.कुणी पाच तर कुणी वीस वर्षांचा हिशोब मागतो.त्यामुळे उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये यावरून सोशल मीडियावर जोरदार वॉर सुरु असल्याचे चित्र आहे.
बरेचदा निवडणूक आचारसंहितेचा भंग सुद्धा होतो पण याकडे यंत्रणेचे फारसे लक्ष नसते.त्यामुळे उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघापैकी आरमोरी मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.यात आरमोरी मतदारसंघात चूरस पूर्ण निवडणूक होण्याची शक्यता आहे.तर शेवटपर्यंत या मतदारसंघात काय चित्र असेल यावर विश्लेषकांनी सध्या बोलणे टाळले आहे.निवडणुका म्हटले की,आरोप प्रत्यारोप आलेच यात काही नवीन नाही.सोशल माध्यमांवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट आणि त्यावर होणाऱ्या वादाकडे उमेदवार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.यावर कसलीही प्रतिक्रिया देणे टाळत आहेत.ते योग्य देखील आहे. मात्र,सध्या उमेदवारांचे समर्थक आपल्याच उमेदवारांना तिकीट झाल्याचे भासवित असल्याने तशी जोरदार पोस्टर बाजी सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे.काहींच्या मते,पुरे झाल्या संधी. जनतेंनी अनेकांना संधी दिल्यात,आता नव्यांना संधी देणे आवश्यक आहे.महत्वाचे म्हणजे,ज्यांच्याकडे सर्वात जास्त सेना तयार झाली आहे; अशांनाच उमेदवारी मिळावी; असा जनतेचा कौल दिसून येतो आहे.अन्यथा बाजी मारणारे ‘तेच’ असा सूर उमटू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!