Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरशेतीसाठी सिंध आणायला जंगल परिसरात गेलेल्या इसमावार वाघाने चढविला हल्ला; इसम जागीच...

शेतीसाठी सिंध आणायला जंगल परिसरात गेलेल्या इसमावार वाघाने चढविला हल्ला; इसम जागीच ठार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-हल्ली धान कापणीला वेग आला आहे.धान कापणी करीता मजूर वर्ग शेत बांधावर मोठ्या प्रमाणावर जात आहेत.अशातच गाव खेड्यात धान बांधणी करीता सिंध बांधाची आवश्यकता असल्याने सिंध आणायला जंगल परिसरात गेलेल्या इसमावार वाघाने हल्ला चढविला.यात इसम जागीच ठार झाला असल्याची घटना काल,शनिवारी १० ऑक्टोंबरच्या सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली.विलास तुळशीराम मड़ावी वय ५२ वर्षे,रा.डोंगरगाव असे मृताचे नाव आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र डोंगरगाव सा.कक्ष क्रमांक-२५२ मध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती सिंदेवाही वनविभागाला प्राप्त झाली.त्या आधारे सिंदेवाही वनपरिक्षेत्र (प्रादेशिक)चे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर,क्षेत्र सहाय्यक नितिन गडपायले,पोलिस निरीक्षक विजय राठोड,डोंगरगाव (सा.)आणि कारघाटा येथील पोलिस पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!