- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-आई-वडिलांमध्ये घरी रोजची होणारी भांडणे आणि कौटुंबिक कलहामुळे तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा गावात घडली.सुहानी इलापते वय १८ वर्षे असे तरुणीचे नाव आहे.ती बी.ए.च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.
मिळालेल्या माहितीनुसार,सुहानीच्या कुटुंबात आई-वडील,एक बहीण आणि एक भाऊ आहे.कौटुंबिक परिस्थिती आणि घरातील रोजची भांडणे यामुळे सुहानी तणावाखाली राहू लागली.दरम्यान,१७ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ती शेतात गेली आणि दुपारी २ वाजता घरी परतली.तिचे वडील खाटेवर आराम करीत होते.वडिलांशी बोलत असतानाच तिला उलट्या होऊ लागल्या.जीवन संपवण्याच्या उद्देशानेच तिने टोकाचे पाऊल उचलले असून शेतातच विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती पुढे आली आहे.घरी आल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने आजूबाजूच्या लोकांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले असता,उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या संदर्भात सुहानीचे वडील रवींद्र इलापते वय ४४ वर्षे यांच्या तोंडी तक्रारीवरून आणि हॉस्पिटलने दिलेल्या मेमोच्या आधारे लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
- Advertisement -

