Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीपुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार कर्जाचे ओझे.. -धानाच्या उतारीत मोठ्या प्रमाणात घट..

पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार कर्जाचे ओझे.. -धानाच्या उतारीत मोठ्या प्रमाणात घट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यंदा शेती व्यवसाय साथ देईल,अशी आशा असतांना दोनदा अतिवृष्टीचा फटका बसला.वारंवार हवामानात बदल होत असल्याने धानपिकांवर विविध रोगाने आक्रमण केले.रोगांना आटोक्यात आणले.मात्र,  रोगांचा धानपिकांना फटका बसल्याने धान निसविन्याच्या तारणेत असताना धानाची लोंब कमी मात्र पांढरी धानाची लोंबी जास्त निघाल्याने धानाच्या उतारीत मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे धानपिकावर विविध रोगाने आक्रमण केले असून धानपीक फस्त केलेली आहेत. धान पिकांवर लागलेल्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी महागडी कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली.मात्र,रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.ऐन धानपीक निघण्याच्या तारणेत असताना धानपिकातून मोठ्या प्रमाणात पांढऱ्या धानाची लोंबी (पेरवा) निघत असल्याने यंदा धानपिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.त्यामुळे लागवड खर्च निघेल याची शाश्वती नसल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचे ओझे बसणार असल्याने बळीराजा चिंतातुर अवस्थेत जीवन जगत आहे.पेरणीपासून तर धानपीक निघेपर्यंत बळीराजा या पिकांची पोटच्या गोळ्याप्रमाणे देखरेख करतो.दरवर्षी शेती व्यवसाय डुबत असला तरी मोठ्या आशेने शेती कसतो.जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.दरवर्षी शेती व्यवसाय धोक्यात येत असला तरी पर्याय नसल्याने नाईलाजाने हाच व्यवसाय करावा लागतो.याच व्यवसायातून मुलांचे शिक्षण,लग्न समारंभ,कुटुंबाचा उदरनिर्वाह यासह अन्य व्यवहार यातूनच करावे लागतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!