Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरसरत्या वर्षाची पार्टी आटोपून घरी परतलेल्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...

सरत्या वर्षाची पार्टी आटोपून घरी परतलेल्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मित्रांनी गावात सरत्या वर्षाची पार्टी ठेवली. पार्टीला मित्र मंडळींनी हजेरी लावत पार्टीचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परतले.अशातच पार्टी आटोपून घरी परतलेला एक तरुण रात्री १ वाजेच्या सुमारास घरी ठेवलेली दुचाकी घेऊन निघाला; मात्र,घरी परतलाच नाही.तोच दुसऱ्या दिवशी गावाजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,बुधवारी १ जानेवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदरची घटना पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूर येथे घडली.विकास परशुराम वडस्कर वय २७ वर्षे,रा.सोनापूर, ता.पोंभूर्णा असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,सरत्या वर्षाला सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पार्टीची धूम असते.त्यामुळे मित्रांनी गावात पार्टीचे आयोजन केले होते.या पार्टीत विकासने सहभाग घेतला होता.पार्टी आटोपून तो घरी आला घरच्या कुणालाही न सांगता एमएच ३४ बिके ६७७१ क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर निघून गेला व त्याने गावाजवळील शरद ठेंगणे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.तरुणाने आत्महत्या कां केली? हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!