Thursday, April 16, 2026
Homeधाराशिवसरपंचाची कमाल; स्वतःच्याच हल्ल्याचा केला बनाव..

सरपंचाची कमाल; स्वतःच्याच हल्ल्याचा केला बनाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
धाराशिव :-राज्यात सध्याच्या घडीला बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंचाने स्वतःच्याच हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील ३८ वर्षीय सरपंच नामदेव बालिश निकम यांच्यावर २६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास होनाळा ते जवळगा (ता.तुळजापूर)रस्त्यावर चार अज्ञात व्यक्तींनी दगड, अंडी,पाईपने मारुन सरपंचांच्या चारचाकीचे काच फोडून पेट्रोलने भरलेले फुगे सरपंचांच्या व त्यांचे साथीदार प्रवीण इंगळे यांच्या अंगावर फेकले.याबाबतची फिर्याद निकम यांनी २७ डिसेंबरला दिल्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी तातडीने यात लक्ष घालून अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे तपास दिला.अवघ्या पाच दिवसांत तपास करून फिर्यादीने दिलेला जबाब व घटनास्थळाचा पंचनामा केला असता दोन्ही बाबी वेगवेगळ्या आढळून आल्याने पोलिसांनी विश्वासात घेऊन दोघांचीही चौकशी केली.त्यानुसार बंदुकीचा परवाना मिळविण्याकरीता स्वतःच हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.त्यानुसार आता बनाव प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!