Saturday, April 18, 2026
Homeनागपूरदुकानाचा पोर्च कोसळला; सिमेंट मलब्याखाली दबून युवकाचा मृत्यू..

दुकानाचा पोर्च कोसळला; सिमेंट मलब्याखाली दबून युवकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दुकानाच्या पोर्चमध्ये काहीकाळ उभ्या असलेल्या युवकाचा अचानकरित्या एक पोर्च कोसळल्याने सिमेंट मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २ जानेवारीच्या सकाळी ७.३० वाजे दरम्यान नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील गंगा अपार्टमेंटमध्ये घडली.अजय अशोकराव इंगळे वय ३५ वर्षे,रा.चांदणी कोकडा,जि.वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे.
परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली.अग्निशमनच्या जवानांनी पडलेला मलबा बाजूला करून संबंधित युवकाला बाहेर काढले व तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तपासणी अंती युवकास मृत घोषित केले.पोर्चचा सिमेंट मलबा युवकाच्या अंगावर पडल्याने त्याचा सिमेंट मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!