Sunday, October 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात घेण्यात आले आहे.भोंदूबाबा अशोक खरातची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. अंमलबजावणी संचालनालय(ईडी)आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त धाडीत कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचे ठोस पुरावे समोर आले आहेत. फसवणूक आणि खंडणीतून मिळालेला पैसा जमिनींमध्ये गुंतवून मोठे आर्थिक जाळे उभारल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.तपासादरम्यान खरातच्या घरातून मालमत्तेच्या ‘कच्च्या नोंदी’ असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली.अधिकृत नोंदणी टाळून केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करून अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. कर चुकवण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा मार्ग वापरला जात असल्याचा संशय आहे.ईडी व इतर तपास यंत्रणेकडून त्याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अश्यातच आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके वय ५३ वर्षे यांचा छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असतांना समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावाजवळ दुपारच्या सुमारास कार अपघातात मृत्यू झाला.जितेंद्र शेळके हे अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिले आहेत.त्यातच,अशोक खरातची जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही भागिदारी होती.अशोक खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते.जितेंद्र शेळके हे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास कारने आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते.जात असतांनाच धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात जाऊन धडकली आणि मागील भागात जाऊन फसली.धडक इतकी भीषण होती की,कारचा चक्काचूर झाला.यात जितेंद्र शेळके,पत्नी अनुराधा व मुलगा तिघेही कारमध्येच अडकून पडले होते.दरम्यान,जितेंद्र शेळके,पत्नी अनुराधा यांचा मृत्यू झाला,तर जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.अपघात घडताच नागरिकांनी तसेच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले.अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!