Thursday, July 9, 2026
Homeनागपूरताडोबात रेस्क्यू सेंटर बांधकामाच्या हालचालींना वेग..

ताडोबात रेस्क्यू सेंटर बांधकामाच्या हालचालींना वेग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वर्चस्व असलेल्या छोटा मटकाची मागील वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला ‘ब्रम्हा’ वाघाशी झुंज झाली होती.या संघर्षात ब्रम्हा ठार झाला होता,तर छोटा मटका गंभीर जखमी झाल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले होते.तो लंगडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने छोटा मटका वाघाच्या उपचारातील निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली होती.सुरुवातीला छोटा मटकावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते.नंतर त्याला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले होते.वन्य प्राण्यांतील संघर्ष,जखमी किंवा आजारी वन्यप्राण्यांवर त्वरित उपचार करणे,अनाथ बछड्यांचे संगोपन करणे वा इतर कारणांसाठी प्रकल्पात एक संपूर्ण आणि आधुनिक रेस्क्यू सेंटरची गरज अधोरेखित करण्यात आली. त्यानुसार,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी घेण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत.ताडोबात एफडीसीएम म्हणजेच फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत रेस्क्यू सेंटरचे बांधकाम होणार आहे.सुनावणी दरम्यान ॲड.सांबरे यांनी नमुद केले की,प्रकल्पातील बांधकामासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे.त्यामुळे ही अनुमती आवश्यक आहे.न्यायालयाने दोन आठवड्यांत कार्यवाही करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले.तसेच सेंटरचे बांधकाम करणाऱ्या फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनला प्रधान सचिवांकडे अर्ज करण्याचे आदेशही दिले.दोन आठवड्यांत कार्यवाही पूर्ण होताच ताडोबातील रेस्क्यू सेंटर बांधकामाचा मार्ग मोकळा होऊन वन्य प्राण्यांवर वेळीच उपचार होण्यास मदत होईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!