Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरशेतात बिबटच्या पिल्लाचे दर्शन; वन विभाग बांधावर..!

शेतात बिबटच्या पिल्लाचे दर्शन; वन विभाग बांधावर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील कवठी  गावातील एका शेतात कापूस वेचनाऱ्या महिला मजुरांना बिबटचे पिल्लू मंगळवारी दिसून आले. याबाबत सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.सी.धुर्वे यांना माहीती देण्यात आली.माहिती मिळताच वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटणास्थळी पोहोचले व उपचारासाठी बिबटच्या पिल्लाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
कापूस वेचणाऱ्या मजूरांना बिबट्याचे पिल्ले दिसताच त्यांनी याबाबत वनविभागाला कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता,एक वीस ते पंचवीस दिवसाचे बिबट्याचे पिलू आढळले.त्या पीलाची आई त्याला रात्री सोबत घेऊन जाणार या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्या पिल्लाला तिथेच ठेवण्याचा संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांसोबत चर्चा करुण सकाळ पर्यंत प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला.त्या ठिकाणी चार कॅमेरे पण लावण्यात आले.परंतु काल बुधवारी सकाळी वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता,ते पिलू त्याच ठिकाणी होते.थोडे कमजोर ही वाटत होते. ही माहिती विभागीय वनाधिकारी, प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) व्ही.एस. तरसे यांना देण्यात आली यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर कुंदन पोडचलवार यांचे सुचनेनुसार आणि सहाय्यक वनसंरक्षक पी.पी. खेडकर,वनपरिक्षेत्र अधिकारी सावली व्ही.सी.धुर्वे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे व सदस्य तन्मयसिंह झिरे यांनी त्या मादी बिबट्याच्या पिलाला सुरक्षितपणे पकडुन पुढील उपचारासाठी त्या पिल्लाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!