Saturday, May 2, 2026
Homeगोंदियापत्नी आजारी अन् मुलीच्या लग्नाची चिंता; बापाने संपवली जीवनयात्रा...

पत्नी आजारी अन् मुलीच्या लग्नाची चिंता; बापाने संपवली जीवनयात्रा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-आई-वडील जीवाचे रान करून संसाराचा गाडा कसा हाकता येणार,अश्या विवंचनेत नेहमी असतात.त्यातच मुलांना लहाण्याचे मोठे करण्यात मोठी दमछाक करावी लागते.अशातच मुले मोठी झाली की,मुलांच्या शिक्षणाची,लग्नाची चिंता नेहमी भेडसावत असते.काहीजण कर्जबाजारी होऊन चींतेतून सावरण्याचा प्रयत्न करीत असतात.असाच काहीसा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथे मंगळवारी उघडकीस आला.मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून बापाने शेतातील पळसाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.मोहनलाल गोविंदा घरतकर वय ५५ वर्षे असे आत्महत्या केलेल्या मुलीच्या बापाचे नाव आहे.मोहनलाल यांची पत्नी नेहमीच आजारी राहत असून लहान मुलगी लग्नाची आहे.तिच्या लग्नासाठी पैसे कुठून आणावेत या चिंतेत होते.यातूनच सोमवारी  २३ डिसेंबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास मोहनलाल मुलीच्या गावी नवेगावबांध येथे जातो असे सांगून घरातून निघाले. मात्र,त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुसऱ्या दिवशी मंगळवारी  सकाळच्या सुमारास उघडकीस आले.यशवंत गोविंदा घरतकर रा.बाराभाटी यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!