Sunday, May 31, 2026
Homeगोंदियाजंगली हत्तींचा धुमाकूळ; तीन शेतकऱ्यांवर हल्ला..

जंगली हत्तींचा धुमाकूळ; तीन शेतकऱ्यांवर हल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जंगली हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात धुडगूस घालत कुरखेडा मार्गावरून ११ मार्च २०२६ रोजी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शिरकाव केला.गुरुवार १२ मार्चच्या सकाळी हत्तींच्या कळपाचे लोकेशन गोंदिया जिल्ह्यातील केशोरी वनक्षेत्रात आढळून आले.हत्तींच्या कळपाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथील शेतशिवारातील मक्याचे पीक उद्ध्वस्त करून हत्तींनी लगतच्या जंगलात ठाण मांडले होते.११ मार्च रात्रीच्या वेळी हत्तीच्या कळपाने शेत शिवारातील उभ्या मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशातच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव बंध्या परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने मागील आठवडाभरापासून धुमाकूळ घातला आहे.परिसरातील मका पिकासह अन्य पिकाचे नुकसान केले.अश्यातच नुकतेच शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांवर जंगली हत्तींनी हल्ला केल्याने तीन शेतकरी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दयाराम घुगुसकर, आसाराम निमकर,उज्ज्वल चिंचेकर सर्व रा.वडेगाव बंध्या यांचा समावेश आहे.त्यांच्यावर केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
वडेगाव बंध्या येथील शेतकरी दोन दिवसांपूर्वी सकाळी नेहमी प्रमाणे शेतात गेले होते.शेतशिवारात हत्तींचा कळप असल्याची त्यांना कसलीच कल्पना नव्हती. दरम्यान,शेतात काम करीत असतांना अचानक हत्तींचा कळप शेतकऱ्यांवर धावून गेला आणि शेतकऱ्यांना पाठीमागून धक्का दिला.यात तिन्ही शेतकरी जखमी झाले.यावेळी जखमी अवस्थेतच शेतकऱ्यांनी पळ काढला व आपले प्राण वाचविले. घटनेची माहिती त्यांनी गावात दिली.तिन्ही जखमी शेतकऱ्यांना केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेने परिसरातील शेतकरी धास्तावले असून जंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!