Sunday, August 30, 2026
Homeगोंदियाशेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू..!

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात एका वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे.विहिरीला कठडे नसल्याने वाघ थेट शेतातील विहिरीत पडून मृत पावल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत येणाऱ्या कोडेलोहारा परिसरात आज,रविवार १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विहिरीत पडून मृत पावलेला वाघ हा चार ते पाच वर्षाचा होता.
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याची माहिती वन विभागास मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव वन क्षेत्राचे जलद बचाव पथक आणि भंडारा वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे,सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे,मनिषा चव्हाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि अथक परिश्रमानंतर वाघाला विहिरीतून बाहेर काढले.प्राथमिक तपासात सदरचा वाघ हा शिकारीच्या वा पाण्याच्या शोधात भटकत असतांना तोल जाऊन विहिरीत पडला असावा,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अपघात की काय? याचा तपास सुरू असून वनविभागाने ‘व्हिसेरा सॅम्पल’ प्रयोगशाळेत पाठवला. वाघाच्या मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!