Wednesday, October 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! फ्री रिचार्ज..फ्री गिफ्टच्या आमिषाला बळी पडू नका.. - अनोळखी लिंकवर क्लिक...

सावधान..! फ्री रिचार्ज..फ्री गिफ्टच्या आमिषाला बळी पडू नका.. – अनोळखी लिंकवर क्लिक करू नये- सायबर पोलीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून फ्री रिचार्ज सह आता नाताळ,नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सायबर लुटारूंकडून फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांसह,पेटीएम,फोन पे,गुगल पे यांसारख्या बनावट ॲपद्वारेही फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे.काही ठिकाणी असे प्रकार होत असल्याने बनावट ॲप व सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सायबर पोलिसांकडे ऑनलाइन फसवणुकीच्या वेगवेगळ्या तक्रारी येत असतात.यात आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलिस ठाण्यांपर्यंत येणारे अनेक जण असतात.त्यात सण-उत्सव काळात सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय होत असतात.त्यात आता नाताळ,थर्टी फर्स्ट आणि नववर्षानिमित्ताने सोशल मीडियावर विविध ऑफरसह फ्री गिफ्ट,फ्री रिचार्जचे आमिष दाखवून फसवणकीच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता अनोळखी लिंकवर क्लिक करू नये; असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमीषाला बळी न पडता सजग राहणे गरजेचे आहे.
प्रत्यक्षात सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते.ही लिंक डाऊनलोड केल्यास भ्रमणध्वनी,संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवितात.त्याआधारे आर्थिक फसवणूक,माहितीची चोरी,बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात.त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे; असेही आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!