Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाशेतकऱ्याने गहाण ठेवलेले सोने परत करण्यास सावकाराकडून टाळाटाळ..

शेतकऱ्याने गहाण ठेवलेले सोने परत करण्यास सावकाराकडून टाळाटाळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील सावकार शांताबाई राधेश्याम अग्रवाल यांच्याकडे शेती कामासाठी स्वतःकडील सोने गहाण ठेवून शेतकऱ्याने पैसे उचलले होते.काही दिवसांनी व्याजासह रक्कम परत करून गहाण ठेवलेले सोने परत मागितले असता सावकाराकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.या प्रकरणी शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.भंडारा जिल्ह्यातील विरगाव येथील रहिवासी नरेश सदाशिव गजभिये असे अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,नियमानुसार कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोने तारण कर्ज देता येते.मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्याचे सोने गहाण ठेवण्यात आल्याने परवानाधारक सावकारांची चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवतांना वजन,रक्कम व व्याजाची पावती देणे आवश्यक आहे.मात्र,अनेक सावकारांकडून पावती न देता साध्या कागदावर व्यवहार करण्यात येत आहेत.नरेश गजभिये हे आदिवासी समाजातील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!