Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीआता आधार लिंक करूनच खतांची विक्री.. - विक्रेत्यांची करामत; जास्त गोण्यांची नोंद...

आता आधार लिंक करूनच खतांची विक्री.. – विक्रेत्यांची करामत; जास्त गोण्यांची नोंद करून प्रत्यक्षात कमी खत देण्याचे प्रकार निदर्शनास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच काळाबाजार,साठेबाजी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,आता आधार लिंक केल्याशिवाय खतांची विक्री करता येणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामागील प्रमुख उद्देश म्हणजे खतांचा योग्य वापर सुनिश्चित करणे,अपव्यय टाळणे आणि शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात व योग्य दरात खत उपलब्ध करून देणे हा आहे.यासाठी सर्व खत विक्रेत्यांना पॉईंट ऑफ सेल(e-POS)मशीनचा वापर करूनच खत विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.संबंधित मशीनद्वारे शेतकऱ्यांची ओळख पटवूनच व्यवहार नोंदविणे आवश्यक राहणार आहे.
काही ठिकाणी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन जास्त गोण्यांची नोंद करून प्रत्यक्षात कमी खत देण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.विशेषतः युरिया खताच्या बाबतीत अशा प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने या निर्णयाद्वारे अशा गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभागाने खत विक्रेत्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.त्यानुसार,कोणत्याही परिस्थितीत आधार लिंक करूनच खत विक्री करावी लागेल.तसेच e-POS मशीनवरील ग्राहकाचे नाव, विक्री केलेल्या गोण्यांची संख्या आणि दिलेले बिल यामध्ये तंतोतंत सुसंगती असणे आवश्यक आहे. विक्रेत्यांच्या गोदामातील साठा आणि e-POS प्रणालीवरील साठा यामध्येही अचूक मेळ असणे बंधनकारक करण्यात आले आहे.याशिवाय खतांची विक्री केवळ शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीतच करावी,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान,ज्या विक्रेत्यांनी नवीन e-POS प्रणालीमध्ये नोंदणी केली नाही किंवा नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर कृषी विभागाकडून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!