Thursday, September 3, 2026
Homeभंडारामित्र रील शूट करत राहिले अन् 'तो' वाचवा-वाचवा म्हणून ओरडतच राहिला; मित्रांना...

मित्र रील शूट करत राहिले अन् ‘तो’ वाचवा-वाचवा म्हणून ओरडतच राहिला; मित्रांना वाटले रीलचाच भाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सोशल मीडियाचा नादच खुळा.कुणी प्रसिध्दीसाठी तर कुणी चांगल्या कार्यासाठी वापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवू लागलेत.मात्र,कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कधी ना कधी जीवघेणा ठरतच असतो.अश्याच प्रकारे तिघे मित्र शाळेला सुट्टी असल्याने काल रविवारी गावापासून दूर अंतरावर मोबाईलवर रिल शूट करण्यासाठी गेले.रिल शूटिंगसाठी तिघांनी एका गावानजीक असलेल्या मुरुमाच्या खदाणीची निवड केली.त्यानुसार दोघा मित्रांनी मोबाईल हातात घेत रील शूटिंग सुरू केले तर एकाने मुरुमाच्या खदाणीतील पाण्यात उडी घेतली.उडी घेताच वाचवा-वाचवा म्हणू लागला.पण,दोन मित्रांना वाटले की,हा तर रिलचाच भाग आहे.त्यामुळे दोघांनीही दुर्लक्ष केले आणि होत्याचे नव्हते झाले.यात एका १८ वर्षीय
तरुणाचा रील काढण्याच्या नादात बुडून मृत्यू झाला. सदरची घटना काल,रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा-कोसरा गाव हद्दीत घडली. तीर्थराज धनपाल बारसागडे वय १८ वर्षे रा.सोनेगाव, ता.पवनी असे मृत तरुणाचे नाव आहे.मृतक हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता.घाबरलेल्या मित्रांनी गावात फोन करून घटनेची माहिती दिली.काही वेळातच गावकरी आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.तीर्थराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आला.घटनेने संपूर्ण परिसरात मोठा हादरा बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!