Friday, September 25, 2026
Homeआरमोरीमहायुती सरकारने महिलांसाठी तयार केलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा- महिला संपर्कप्रमुख...

महायुती सरकारने महिलांसाठी तयार केलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा- महिला संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे     

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :-गडचिरोली जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी निर्माण केलेल्या विविध योजनांचा लाभ सर्व स्तरातील महिलांनी घ्यावा; असे आवाहन शिवसेना शिंदे गटाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या  महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील दौऱ्या दरम्यान केले  आहे.                        

महायुती सरकारच्या कार्यकाळात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने महिलांना मोफत तीन सिलेंडर गॅस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत  देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे नुकतीच घोषित केलेली शासनाची लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत २१ वर्षावरील महिलांना दरमहा १५०० रुपयाचे सानुग्रह अनुदान शासनाच्या वतीने महिलांना देण्यात येणार आहे.त्यासाठी आजपर्यंत जवळपास अनेक महिलांची नोंदणी सुद्धा करण्यात आलेली आहे.दौऱ्या दरम्यान जिल्ह्यात वर्षाताई फिरत असताना अनेक गावांच्या भेटी त्यांनी घेतलेल्या आहेत.अनेक महिलांना विविध योजना विषयी मार्गदर्शन करीत आहेत.यामध्ये प्रामुख्याने महायुती सरकारने अंगणवाडी सेविका व आशा वर्कर सेविका तसेच गटप्रवर्तकांना कर्तव्यात असताना जर अपघात झाल्यास दहा लाख रुपये निधी त्यांना मिळणार असून अपंगत्व आल्यास पाच लक्ष रुपयांचा निधी सुद्धा मिळणार आहे.त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण योजना ही सुद्धा महायुती सरकारने निर्माण केलेली असून या योजनेचा सुद्धा सर्व मुलींनी लाभ घ्यावा; असेही मार्गदर्शन त्यांनी केले आहे.त्यानंतर आनंदाचा शिधा शासनाच्या माध्यमातून जे पिवळे रेशन कार्ड धारक आणि केसरी कार्डधारक  लाभार्थी आहेत; अशांना आनंदाचा शिधा हा शासनातर्फे यावर्षी सुद्धा गणेश चतुर्थीच्या दरम्यान मिळणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना यामध्ये महिलांचा उद्योगात सहभाग व महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिलांना उद्योग क्षेत्रात भरारी मिळण्यासाठी या योजनांचा सुद्धा लाभ महिलांनी घ्यावा; असेही आवाहन वर्षाताई मोरे यांनी  मार्गदर्शन दरम्यान केले.विविध भागाचा दौरा करीत असताना त्यांनी अनेक महिलांच्या सरकारने योजना तयार केल्या असून या योजनेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.तसेच महिलांना जास्तीत जास्त लाभ देणे विषयी सुद्धा वर्षाताई मोरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली असून जास्तीत जास्त सहकार्य करावे; अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!